Monday, November 17, 2008

भक्ती का करावी ?

भक्ती का करावी ?
समर्थ म्हणतात ,' नरदेहाचे उचित काही करावे आत्महीत
यथानुशक्त्या चित्तवित्त सर्वोत्तमी लावावे - -१३
नरदेहाचे सर्वोत्तम उद्दिष्ट भगवंताची प्राप्ती करून घेऊन जन्ममृत्युचा फेरा चुकवणे आहे . म्हणून समर्थ म्हणतात
या नरदेहाची प्राप्ती झाल्यावर काही तरी आत्महीत करावे .भक्ती पंचकात समर्थ म्हणतात - दु:मूळ हा संसार
तयामध्ये भक्ती सार हा संसार दु :मूळ आहे .कोणत्याही भौतिक गोष्टीमुळे मिळालेला आनंद क्षणिक असतो कारण ज्या गोष्टीँमुळे आपण आनंद मिळवतो - गाडी ,घर , व्यवसाय ,मुले,संसार या सर्व गोष्टी नाशवंत आहेत ,
असार आहेत .त्यातून मिलवलेला आनंद शाश्वत नाही.शाश्वत आनंदाच्या प्राप्ती साठी भक्ती सार आहे .
भक्तीने काय साधते हे समर्थ भक्ती पंचकात सांगतात ,उपमन्यूने धावा केल्यावर त्याला क्षीरसागर भगवंतानी
त्याला दिला .ध्रुवाला पद दिले .पोपटाच्या निमित्ताने राघवाचे नाम घेणा-या गणिकेला मुक्त केले .शंकरानी
राम नाम धारण केल्यावर त्यांचा कंठातील दाह थांबला
मानवात त्रिगुण वास करत असतात त्यातला रजोगुण माणसाला जन्ममृत्युच्या फे-यात अड्कवतो .रजोगुण
सुटत नाही तर काय कराव असे शिष्यानी विचारल्यावर समर्थ म्हणतात ,
उपाय एक भगवद भक्ती जरी ठाकेना विरक्ती
तरी यथानुशक्ती भगवद भजन करावे - -३६
विरक्ती जरी आली नाही तरी जमेल तशी भक्ती करायला समर्थ सांगतात .कारण सामान्यातला सामान्य सुध्दा भक्तीमार्गाचा पाईक होऊ शकतो .वेदांताचा अभ्यास करता सुध्दा भक्तीमार्गाची वाटचाल करता येते .एक गोष्ट
आहे.एका खेड्यात एक म्हातारी बाई रहात होती .तिने एका प्रवचनात ऐकले की आपली सर्व कर्म कृष्णार्पण
करावीत .ती प्रत्येक कर्म ,प्रत्येक कृती करताना कृष्णार्पण म्हणू लागली .खाताना,जेवताना ,स्वयंपाक करताना
आंगण सारवताना कृष्णार्पण म्हणू लागली .असे म्हणता म्हणता एक दिवस अंगण सारवताना शेणाचे गोळे
श्रीकृष्णार्पणमस्तु म्हणून टाकू लागल्यावर त्या गावातील कृष्णाच्या मूर्ती वर येऊन पडू लागले .लोकांना
कळेना हे गोळे कोठून येत आहेत .शोध घेता घेता कळले की म्हातारी गोळे टाकते आहे आणि ते गोळे कृष्ण
मूर्ती वर पडत आहेत .लोकांनी म्हातारीला मारायला सुरुवात केली .श्री कृष्ण भगवान प्रकट झाले .म्हातारीची
जीवनज्योत कृष्ण मूर्तीत विलीन झाली .कर्म ईश्वरार्पण केल्याने साधकाला दु :खे हलकी व्हायला मदत होते ,
यश अपयश पचवायला मदत होते .अति दु : ,अति सुख ,कोणताच अतिरेक होत नाही .
पापी ,दुराचारी माणसालाही उध्दरून नेण्याचे सामर्थ्य भक्तीच्या ठायी आहे .भक्तीयोगाचा अभ्यास सुफलीत झाला
की मिळालेला आनंद स्व:पुरता रहात नाही .संत ,ज्ञानी भक्त आपला अनुभव जगाला वाटतात .त्यामुळेच
दासबोध,ज्ञानेश्वरी ,एकनाथी भागवत यासारखे ग्रंथ निर्माण झाले
भक्ती ज्ञानाचा अंकुश आहे .ज्ञानाचा अंहकार भक्ती नाहीसा करते .दासबोधाचे कर्तेपण समर्थ स्व:कड़े घेत
नाहीत .ते म्हणतात ,
भक्ताचेनि साभिमाने कृपा केली दाशरथीने
समर्थ कृपेची वचने तो हा दासबोध २० -१० -३०
श्री रामरायाने भक्ताचा म्हणजे समर्थांचा अभिमान धरला .त्यांच्यावर कृपा केली .समर्थांच्या [श्रीरामांच्या ]
कृपेने वचने स्फूरली.त्या वचनांचा संग्रह म्हणजे दासबोध आहे
आपले विहित कर्म ईश्वरार्पण भावनेने करणारा भक्त देवाला आवडतो .एकदा नारदांनी भगवंताला विचारल ,
भगवंता आपला सर्वात आवडता भक्त कोणता ? भगवंतानी शेत-याचे नाव घेतले .नारदांना आश्च- वाटले.
तो शेतकरी एकदाच तुमचे नाव घेतो ,तो तुमचा आवडता भक्त कसा ?
भगवंतानी नारदाला एक गडू भरून तेल दिले ,पृथ्वी प्रदक्षिणा करायला सांगितली .अट घातली की एक थेंब ही पृथ्वी वर पड़ता कामा नये .नारद महाराज निघाले पृथ्वी प्रदक्षिणेला ! संपूर्ण लक्ष होत तेलाकडे ! पृथ्वी प्रदक्षिणा
करून नारद भगवंताकडे .भगवंताने विचारले ,'नारदा ,किती वेळा नाम घेतलस? नारदांकड़े उत्तर नव्हते .भगवान
म्हणाले ,'आता कळले का शेतकरी माझा सर्वश्रेष्ठ भक्त का ?

3 comments:

rashmi said...

Tumcha upkram khup awadala.Kharcha navya pidhila as wachyala awdel.Mi hi P.PKshirsagar maharajynchi bhakta ahe.Guruparmparetale guruamhala labhale.Tyamule Ramdasnchybaddal khup kahi wachwe watate.Mi charitra wachal ahe.Pan dasbodha wachychi ichha ahe baghu kadhi jamte.

Abhijit said...

sakal madhe blog wishayi wachale. Khup chan.

suvarna lele said...
This comment has been removed by the author.